Devendra Fadanvis | “अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले”; देवेंद्र फडणवीसांनी वाहिली विक्रम गोखले यांना श्रद्धांजली
Devendra Fadanvis | मुंबई : प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचं आज (26 नोव्हेंबर) पुण्यात निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले (Vikram Gokhale) गेल्या पंधरा दिवसापासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत होती. अशा परिस्थितीत बुधवार संध्याकाळपासून अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झालं असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.
“अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे,” अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
“प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना! ॐ शांति”, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Neelam Gorhe | “रामदेव बाबांचं वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारं”; नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला संताप
- Jitendra Awhad | “ज्या माणसाने दारू पिऊन…”; जितेंद्र आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार हल्लाबोल
- Vikram Gokhale | ‘या’ चित्रपटातून विक्रम गोखले यांनी केला होता फिल्मी दुनियेत प्रवेश
- Amol Kolhe | “भूमिका घ्यायला कचरण्याच्या काळात…” ; अमोल कोल्हेंची विक्रम गोखलेंसाठी भावूक पोस्ट
- Eknath Shinde | विक्रम गोखलेंच्या जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे नुकसान – एकनाथ शिंदे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.