Devendra Fadanvis | “उद्धव ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे त्यांचा मोर्चाही..”; देवेंद्र फडणवीस यांचा मिश्किल टोला 

Devendra Fadanvis | मुंबई :  महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत (Mumbai) मोर्चा काढण्यात आला. महामोर्चातून महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन आणि हल्लाबोलही पाहायला मिळालं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर टीका करत खिल्ली उडवली आहे.

ते म्हणाले, “तीन पक्ष एकत्र येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला. आज तुम्ही कुणीही ड्रोन शॉट नाही दाखवू शकलात. आज क्लोज अप दाखवावे लागले. कारण ड्रोन शॉट लायक मोर्चाचं नव्हता. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदानावर या. पण, आझाद मैदानाएवढी संख्या राहणार नाही हे माहीत असल्यामुळं जिथं रस्ता लहान होतो, अशी जागा त्यांनी निवडली.”

“या मोर्चाचं कुठलं विराट स्वरुप उद्धव ठाकरे यांना दिसलं ते माहिती नाही. जसा त्यांचा पक्ष नॅनो होत आहे, तसा त्यांचा मोर्चाही नॅनोच होता”, असा मिश्किल टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचा पुनरुच्चार केला. यावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं.

”उद्धव ठाकरेंची कॅसेट गेल्या १० वर्षांपासून तिथेच अडकली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाही. भारताचं संविधान सर्वोच्च आहे हे त्यांनाही माहिती आहे. तरीही तेच तेच डायलॉग ते किती दिवस मारणार आहेत?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.