Devendra Fadanvis | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यामागे नक्की कोणाचा हात?, देवेंद्र फडणवीसांना केला खुलासा

Devendra Fadanvis | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देत महाविकास आघाडी पायउतार करुन मुख्यमंत्री बनले. यावेळी त्यांनी भाजप पक्षासोबत युती केली. मात्र, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यामागे नक्की कोणाचा हात आहे, असा प्रश्न अनेकांना उपस्थित होत आहे. याच उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

सत्तांतर घडत असताना सर्व घडामोडी क्रिकेटच्या टी-२० सामन्याप्रमाणे घडत होत्या. जसजसा वेळ पुढे जात होता तस तसे कधी काय निकाल लागेल, याचा अंदाज कोणालाच बांधता येत नव्हता. परिस्थितीनुसार गोष्टी बदलत गेल्या. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर मी जबाबदारीने हे वक्तव्य करतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं, हा माझा प्रस्ताव होता. या प्रस्तावानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याला मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं, हा माझ्यासाठी धक्का नव्हता. पण मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी, हा निर्णय माझ्यासाठी धक्का होता, असा खुलासा फडणवीसांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.