Devendra Fadanvis | “…तर श्रद्धाचा जीव वाचला असता”, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadanvis | मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्याकंड प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. श्रद्धा हत्याकंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक माहिती समोर येत आहे. अशातच एक पत्र समोर आलेलं आहे. हे पत्र म्हणजे श्रद्धाने 2020 मध्ये महाराष्ट्राच्या पालघरमधील तुळींज पोलीस ठाण्यात एक पत्र लिहिले होते.

यादरम्यान, आरोपी आफताब पूनावाला याने मारहाण केली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र श्रद्धाने दिले असल्याची माहिती समोर आली आहे. आफताबने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांकडे जाण्याची हिंमत तिच्यात नव्हती, असं देखील तिने पत्रआत म्हटलं आहे.

ते पत्र माझ्याकडे आले आहे. ते पत्र पाहिल्यांनंतर मला यातील गांभीर्य समजले आहे. ते फार गंभीर पत्र आहे. त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, याचा तपास आपल्याला करावा लागणार आहे. मी कुणावरही आरोप करणार नाही. पण या प्रकारच्या पत्रांवर कारवाई नाही झाली, तर अशा घटना घडतात. त्यामुळे या पत्राचा नक्कीच तपास केला जाईल. जर त्या पत्रावर कारवाई झाली असती, तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आफताबने पत्र लिहलेल्या दिवशी तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि तिला जीवे मारण्याची आणि तिचे तुकडे करून फेकून देण्याची धमकीही दिल्याचे तिने सांगितले त्या पत्रात नमुद केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.