Devendra Fadanvis | “त्यांचा मोर्चा ‘नॅनो’ होता, त्यामुळे थोडा मानसिक परिणाम झालेला आहे”; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला 

Devendra Fadanvis | नागपूर :  ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महामोर्चा म्हणून मराठा मोर्चाचा व्हिडीओ ट्विट केल्याने त्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्ष आपलं अस्तित्व दाखवण्याचं प्रयत्न करतोय आणि त्यांचा मोर्चा हा नॅनो मोर्चा ठरल्यामुळे, ते या ठिकाणी कुठंतरी मला असं वाटतय की आत्मचिंतन करत आहेत. म्हणूनच आपलं अस्तित्व मोठ्या प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे.”

“खरं म्हणजे हा मोर्चा मी ‘नॅनो मोर्चा’ म्हटला तर त्यावर शिक्कामोर्तबच काल एकप्रकारे मराठा मोर्चाचा व्हिडीओ हा त्या मोर्चाचा व्हिडीओ दाखवून जो संजय राऊतांनी ट्वीट केला त्यातूनच हे लक्षात येतय की त्यांचा मोर्चा नॅनो होता, त्यामुळे थोडा मानसिक परिणाम झालेला आहे”, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संजय राऊत यांना लगावला.

दरम्यान, संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओवरून मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसत आहे, यावर फडणवीस म्हणाले “हे होणारच आहे, याचं कारण असं आहे, की एकतर मराठा मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नव्हता, तो मराठा समाजाचा मोर्चा होता. त्या मोर्चाला हीच मंडळी होती ज्यांनी मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून अतिशय विभत्स अशाप्रकारे त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं, आपल्या वृत्तपत्रात छापलं आणि आता पुन्हा तेच लोक त्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करतात आणि मग वर मुजोरी करतात की महाविकास आघाडीने तो मोर्चा काढला होता, आम्ही त्यामध्ये होतो. त्यामुळे हे मराठा समाज सहन करणार नाही.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.