Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांचं एकनाथ शिंदेंबाबत मोठं विधान, म्हणाले…

Devendra Fadanvis | मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचं अस्तित्व अनेक कारणांमुळे धोक्यात आलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

२०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र, निवडणुकीत पक्षाचा चेहरा कोण असेल, हे पक्षातील जनताच ठरवेल, असं देखील म्हणाले आहेत. तसेच एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवू. आमच्याकडे हुकमाचा एक्का आहे. तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्या चेहऱ्यासोबत कोणताही चेहरा जोडा, तो आपोआप पुढे जाईल, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, आज तर आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. जेव्हा निवडणुकीला जाऊ तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. मग नेता कोण असेल, ते पक्ष ठरवेल. भाजपमध्ये एका सिस्टमनुसार निर्णय घेतले जातात, पण एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही पूर्ण बहुमताने निवडणूक जिंकू, असं देखील फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हे माझ्या स्वत:च्या सल्लामसलतीने घडले. त्यांना मुख्यमंत्री बनवा, असे मीच म्हटलं होतं, माझ्यासाठी धक्कादायक म्हणजे तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, असे मला सांगण्यात आलं होतं, पण ज्या प्रकारे पक्षाने माझे मन वळवले, त्यातही पक्षाचे हित होते असे मला वाटते, असं स्पष्टीकरण देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.