Devendra Fadanvis | “मी तर फक्त ट्रेलर आहे, चित्रपट तर मुख्यमंत्री आल्यावर सुरु होतो”, देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी

Devendra Fadanvis |  मुंबई : काल ठाणे येथे ऑल इंडिया बंजारा सेवा संघातर्फे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सत्कार म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekntah Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता. यावेळी दोघांनी भाषण करत जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे चांगलाच हशा पिकला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची फटाकेबाजी –

यादरम्यान, मी फक्त ट्रेलर म्हणून काम करतो, मुख्यमंत्री आल्यावर चित्रपट सुरू होतो, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (  Devendra Fadnvis ) यांनी केलं. तसेच आपल्या गाण्याने आणि नृत्याने बंजारा समाजाने नेहमीच वेगळेपण जपलं आहे, या समाजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही विशेष प्रेम आहे, जुने पूर्वीचे बंजारा समाजाचे लमा मार्ग होते, असं देखील ते म्हणाले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे –

यावेळी भाषण देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आज एका मोठ्या ताकदीच्या रूपात ठाण्यात बंजारा समाज एकत्र आलेला आहे. जंगल आणि निसर्ग संपदेत राहणारा हा समाज आपल्या राज्याचे भूषण आणि वैभव आहे. तसेच या समाजाने राज्याच्या विकासात मोठं योगदान दिलं असून या समाजातील व्यक्तींनी राज्याच्या विकासाला चालना दिली,”

जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्याने हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. शिक्षण आरोग्य या सेवेपासून वंचित राहिलेला हा समाज आहे आणि आता कुठेही तो मागे राहणार नाही. कारण तुमचं सरकार राज्यात आलं आहे, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. मी दिलेला शब्द पूर्ण करणारा व्यक्ती असल्यानेच आज माझ्या मागे ५० आमदारांची ताकद उभी राहू शकली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.