Devendra Fadanvis | मुंबई महापालिकेवर आपलाच भगवा फडकेल ; राज ठाकरेंच्या समोरच देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Devendra Fadanvis | मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सातत्याने भेट घेत आहेत. मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीस यांचा सहभाग हे मुंबईच्या महापालिका निवडणुकीपूर्वी संभाव्य राजकीय युतीचे संकेत मानले जात आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर आपलाच भगवा फडकेल असं विधान केलं. तसेच मतदारांची मने जिंकण्याचं आवाहनही केलं. मंचावर राज ठाकरे उपस्थित असताना आणि समोर मनसे सैनिक असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी हे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मनसे, भाजप आणि शिंदे गट यांची महापालिकेत युती होणार असल्याचं ठरलंय का? अशी चर्चा सगळीकडे आहे.

पुढच्या वर्षीचा आपण दीपावलीचा उत्सव करत असू त्यावेळी महाराष्ट्र सरकारसोबत मुंबईचंही सरकार आपलंच असेल. आपण हाच संकल्प करू या. जनतेची मनं जिंकू या. जनतेची मनं जिंकली की मतं जिंकता येतात. निश्चितपणे आपला भगवा महापालिकेवर फडकवून दाखवू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महापालिकेवर आपला भगवा फडकवू असा सांगत पुढच्या वर्षी दिवाळी साजरी करताना मुंबई महापालिकेतही आपली सत्ता असेल असं म्हटलं. त्यामुळे फडणवीस यांना काय संकेत द्यायचे आहेत? महापालिकेत मनसे, भाजप आणि शिंदे गटाची सत्ता येणार असं फडणवीस यांना सूचवायचं आहे का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र राज ठाकरे यांनी यावेळी कोणतंही राजकीय भाष्य केलं नाही. त्यांनी लोकांनी दिवाळीचा आनंद घेण्याचं आवाहन करतानाच जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मुंबईच्या महापालिका निवडणूक मनसे भाजप आणि शिंदे गटासोबत लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.