Devendra Fadanvis | ‘लव्ह जिहाद’बाबत महाराष्ट्रातही कायदा होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Devendra Fadanvis | नागपूर : दिल्लीत श्रद्धा वालकर यांची हत्या झाल्यानंतर आंतरधर्मीय आणि लव्ह जिहादच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले होते. यासंदर्भात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी या कायद्याविषयी सवाल उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहाद आणि आंतर धर्मीय विवाहाविषयीच्या कायद्या करण्याविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. लव्ह जिहादबाबत कायदा करण्याची राज्य सरकारची मानसिकता असल्याचंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणालेत.

“काही राज्यांनी लव्ह जिहादच्या बाबत कायदे केले आहेत. मी जाणीवपूर्वक सभागृहाला सांगतो, की लव्ह जिहाद हा विषय सर्वात आधी केरळमध्ये बाहेर आला. हे नाव केरळच्या सरकारने त्याला दिलं आहे. हे कुठल्या धर्माच्या विरोधात कार्यवाही आहे असं नाहीये. पण अशा घटना घडतायत. म्हणून वेगवेगळ्या राज्यांनी याबाबत जी भूमिका किंवा कायदे केले आहेत, त्यांचा अभ्यास करून आपल्याकडे यासंदर्भात प्रभावी कायदा करण्याची गरज असेल, तर तो करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे”, असं ते म्हणाले.

“षडयंत्राचा भाग म्हणून कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. आवश्यकता असेल, तर राज्य सरकार नक्कीच तसा प्रयत्न करेल”, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.