Devendra Fadanvis | “हे सावरकरांसाठी सत्ता सोडू शकत नाहीत”; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadanvis | मुंबई :  भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर टीका केली. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटीशांना मदत केली आणि महात्मा गांधी आणि इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला, असा दावा राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी केला.

यावर आता राजकीय वर्तुळातून पडसाद उमटत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा सूचक इशाराही काँग्रेसला दिला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. तर संजय राऊतांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, “ते नुसतं बोलतात, दरवेळेस राहुल गांधी येऊन सावरकरांबद्दल वाटेल तसं बोलतात. शिवसेनेचे नेते ते गेल्यावर एखादं काही वाक्य बोलतात, पण बाकी सत्तेसाठी त्यांच्याच सोबत आहेत. हे सावरकरांसाठी सत्ता कधीच सोडू शकत नाहीत.” एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाले होते संजय राऊत?

भारत जोडो यात्रेच्या अजेंड्यामध्ये वीर सावरकरांचा विषय नव्हता. हा तुमचा खासगी विषय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राला कायमच वीर सावरकरांचा गर्व वाटत राहणार. संपूर्ण देशाला सावरकरांचा अभिमान वाटतो. उद्धव ठाकरेंनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. वीर सावरकर आमचे आदर्श आहेत. आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर. राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असं देखील राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.