Devendra Fadanvis । “ते कोणाची चाकरी करतात हे सर्वांना माहिती आहे”; जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadanvis । मुंबई : पुरंदर पब्लिसिटीतर्फे ‘कार्यक्षम नेतृत्व महाराष्ट्राचे : अजितदादा पवार’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी भाजप-शिंदे गटाला टोला लगावला. गुजरातची सेवा करण्यासाठीच महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करायचं ठरवलं आहे असंही ते म्हणाले. जयंत पाटील यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “ते कोणाची चाकरी करतात हे सर्वांना माहिती आहे, त्यांना काय उत्तर द्यायचं.” फडणवीस पुढे म्हणाले, एकमेकाला पाण्यात पाहणारे, विरोध करणारे, ज्याचे विचार कधीच पटले नाहीत, विचारधारा एक नाही ते आमच्याविरोधात एकत्र येत असतात. ते एकत्र येतील तेव्हा आम्ही त्यांचा सामना करु,” असं फडणवीसांनी सांगितलं. कार्तिकी एकादशीच्या पूजेच्या निमित्ताने पंढरपुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला

काय म्हणाले होते जयंत पाटील?

गुजरातची सेवा करण्यासाठीच महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.”महाराष्ट्रात सुशिक्षित तरुणांची मोठी निराशा झाली आहे. फॉक्सकॉन महाराष्ट्रात आला असता तर किमान ३ ते ४ लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. टाटांचा विमान बनवण्याचा प्रकल्पही गुजरातला गेला. याचा अर्थ जाहीर आहे की या सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करायचं ठरवलं आहे. महाराष्ट्राऐवजी गुजरातची सेवा करायला सरकार निर्माण करण्याचं कट-कारस्थान महाराष्ट्रात झालं”, असं जयंत पाटील म्हणाले होते.

“महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला पळवून नेण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याकडे ढिम्मपणे बघत बसले आहेत”, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले. “या सरकारचा कॉन्फिडन्स कमी झालाय. त्यामुळे यांचं काहीही गुजरातपुढे चालत नाहीये. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हतबल झाले असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केलीय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.