InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राष्ट्रवादी व काँग्रेसचा जाहीरनामा देशद्रोही आहे – देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते म्हणजे देशद्रोह्यांना मदत करणारे नेते असून ते सांगतात की, आमची सत्ता आल्यावर आम्ही कलम 124-अ काढून टाकू म्हणजेच देशद्रोह्यांना मदत करणारे हे नेते आहेत, म्हणून देशद्रोह्यांना मदत करणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बारामती व माढा हलून गेला आहे, असे सांगत शरद पवार समोरून मोदी दिसताच मैदानातून निघून गेले. विरोधकांची भाषणे म्हणजे मनोरंजन असून राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा जाहीरनामा देशद्रोही आहे.

शिक्रापूर येथे महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply