Devendra Fadnavis | असीम सरोदेंना देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला; म्हणाले मूर्खांचा बाजार…

Devendra Fadnavis | मुंबई : उद्या ( 11 मे) ला सत्तासंघर्षाचा निकाल लागणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष याकडे लागलं आहे. याबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे ( Asim Sarode) यांनी निकाल येण्यापूर्वीच दावा केला आहे की, एकनाथ शिंदे राजीनामा देणार. त्याच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे .

एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत : देवेंद्र फडणवीस 

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, त्यांनी केलेला दावा म्हणजे मूर्खांचा बाजार आहे. हे सरकार स्तिर आहे, एकनाथ शिंदे राजीनामा का देतील. शिंदे राजीनामा देणार नाहीत. जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल त्या निर्णय चा आदर करू. आम्ही आशावादी आहोत असं देखील फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते असीम सरोदे ( What did Asim Sarode say)

न्यायमूर्ती शाह 15 मे रोजी निवृत्त होणार आहे. त्यामुळे 11 किंवा 12 मे रोजी हा निकाल लागू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री गेले तर सरकार कोसळण्याची शक्यता असते. मुख्यमंत्र्यांना वाटलं की, आपण अपात्र ठरू शकतो तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाचा राजीनामा देऊ शकतात, असं विधान असीम सरोदे यांनी केलं होत.

महत्वाच्या बातम्या-