Devendra Fadnavis | “इंदू मिल स्मारक संदर्भात महत्वाची बातमी” देवेंद्र फडणवीस म्हणाले
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (What did Deputy Chief Minister Devendra Fadnavis say?)
कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचा आढावा घेत म्हंटलं कि, आपल्या सर्वाचं माहित आहे की, बाबासाहेबांची समाज उद्धारासाठी मोलाचं काम केलं आहे त्यांनी केलेलं काम सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवलं आहे. आपल्या भारताला बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ज्या संविधानाणे प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली, जगण्याचा अधिकार दिला आणि आज भारत प्रगतशील मार्गाने विकसित होतोय. आज भारत जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत झाला. भारताला उंचीवर पोहचवणारं भारताचं संविधान आहे. असं देखील फडणवीस म्हणाले तसचं त्यांनी इंदू मिल स्मारकाबद्दल देखील लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. हे स्मारक जगातील सर्वात वेगळं आणि मोठं स्मारक असणार आहे याचप्रमाणे जगातील कोणतीही व्यक्ती मुंबई मध्ये आली तरी या स्मारकाला भेट दिल्याशिवाय पुढे जाणार नाही असं देखील पडणवीस म्हणाले. त्याच काम या वर्षभराच्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
इंदू मिल स्मारकाबद्दल माहिती: (Information about Indu Mill Memorial)
दादर येथील इंदू मिलच्या १२ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ४५० फूट उंचीच्या स्मारकाची उभारणी केली जात आहे. यामध्ये १०० फूट उंचीची स्मारकाच्या पादपीठाची इमारत उभारण्यात येणार असून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. या स्मारकाची काही वैशिट्ये आहेत. इंदू मिलच्या परिसरातील तळ्याची सुधारणा आणि सुशोभिकरण करून महाडच्या चवदार तळ्याची प्रतिकृती साकारली जाणार. स्मारक इमारतीच्या पाठपीठामध्ये बौद्ध वास्तूरचना शैलीतील घुमट, चैत्यसभागृह, संग्रहालय असेल. तसेच यात प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसचं पुतळ्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी पादपीठात ६ मीटर रुंदीचा आंतरिक आणि बाह्य चक्राकार मार्ग प्रस्तावित आहे. यामध्ये विविध कलाकृती साकारल्या जाणार आहेत १००० नागरिक बसण्याच्या क्षमतेचे प्रेक्षागृहाची उभारणी, आर्टगॅलरी देखील असेल. अशा अनेक सुविधा यामध्ये पाहायला मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; वाचा सविस्तर
- Indbank | इंडबँक मर्चंट बँकिंग सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Ravindra Dhangekar । पुण्यात पुन्हा वाद पेटणार? ‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव’; या गाण्याची सर्वत्र जोरदार चर्चा!
- Coconut | उन्हाळ्यामध्ये नक्की करा नारळाचे सेवन, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे
- Chandrashekhar Bawankule । राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी त्यानंतरच महा
Comments are closed.