Devendra Fadnavis | इर्शाळवाडी घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Devendra Fadnavis | रायगड: रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशात जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी येथे मोठी दुर्घटना घडली आहे.

या ठिकाणी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. या घटनेमध्ये जवळपास 40 घर दबली गेली आहेत. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात सर्वत्र भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे.

A crack has collapsed at Irshalgad in Raigad district

ट्विट करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”

पुढे ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.”

दरम्यान, काल रात्री सुमारे 10.30 ते 11 वाजता ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली (Devendra Fadnavis) आहे. गावातील लोक झोपेत असतानाच त्यांच्यावर हे संकट कोसळलं आहे.

50 ते 60 घरांची ही वस्ती अख्खी मातीच्या ढीगार्‍याखाली दबली गेली आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OhMrvb