Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीस आक्रमक; म्हणाले, “सध्या तरी..”

Devendra Fadnavis | मुंबई : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी 12 फेब्रुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गोरेगाव येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित केले आहे. ‘आपण एकत्र आलो नाही तर आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरीत राहावे लागेल. निवडणुका घेण्याची हिंमत नाही. हिंमत असेल तर लोकसभा, विधानसभा किंवा महापालिकेच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात”, असे खुले आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले होते. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Devendra Fadnavis Commnent on Uddhav Thackeray

“उद्धव ठाकरे असं काहीतर बोलत असतात. सध्यातरी भारताच्या संविधानाप्रमाणे एकत्र निवडणुका होत नाहीत. उद्धव ठाकरे सर्व पक्षाचे नेते झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र करत ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा पंतप्रधानांनी नारा दिला आहे, त्याला समर्थन द्यावं. मग सर्व निवडणुका एकत्रित घेऊ,” असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला उत्तर देताना म्हणाले आहेत.

“आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही” 

‘आम्ही हिंदूत्व सोडलेले नाही भाजप म्हणजे हिंदूत्व नाही’ असं उद्धव ठाकरे म्हटलं, याबद्दल विचारलं असता फडणवीसांनी सांगितलं, “उद्धव ठाकरेंना जैन आणि उत्तर भारतीयांची आता आठवण येत आहे. त्याचप्रमाणे कोण हिंदुत्ववादी आहे आणि नाही हे जनतेला माहिती आहे. कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहून उर्दूत कॅलेंडर काढले, हे सर्व जनतेने पाहिलं आहे,” असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपमध्ये हिंमत नसल्याची टीका केली. ते म्हणाले, शिंदे गट आणि भाजप यांच्यात हिंमत नाही, हे नेहमी दिसून आले आहे. आता त्यांना मी पुन्हा आव्हान देतो, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मग त्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा असो की लोकसभा कोणत्याही निवडणुका घ्या. मात्र, ती हिंमत त्यांच्यात नाही. हिंमत नाही आणि ते स्वतःला हिंदूचे नेते म्हणवतात. हिंमत असते, तोच हिंदू असतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

“भाजप म्हणजे हिंदुत्व नाही”

“हिंदुत्व हा समान धागा असल्याने आम्ही 30 वर्षे राजकीय मैत्री निभावली. आता त्यांना गरज नसल्याने त्यांनी शिवसेना, अकाली दल अशा पक्षांना सोडलं. आता आम्ही युती तोडली. पण तेव्हाही आम्ही हिंदू होतो. आजही आम्ही हिंदू आहोत आणि उद्याही राहू. आम्ही भाजपला सोडलं, मात्र, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. ते जे आज हिंदुत्व चालवत आहेत, ते मी मानायला तयार नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.