Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंवर आजच्या राजकीय परिस्थितीचा विपरीत परिणाम झालायं – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: सध्या ‘कलंक’ या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काल नागपूर शहरामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘नागपूरचा कलंक’ असं म्हटलं आहे. त्यानंतर भाजप आणि ठाकरे यांच्यात वाद सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंवर आजच्या राजकीय परिस्थितीचा विपरीत परिणाम झाला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray will have to consult a psychiatrist – Devendra Fadnavis
माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर आत्ताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा लागणार आहे. अशा मानसिकतेमध्ये एखादा व्यक्ती जर बोलत असेल, तर त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायला हवं. त्यांची ही मानसिक स्थिती आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवी. त्यामुळे मी यावर प्रतिक्रिया देणार नाही.”
दरम्यान, ‘कलंक’ या शब्दावरून वाद निर्माण झाला असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “कलंक या शब्दांमध्ये लागण्यासारख एवढं काय आहे? मात्र, त्यांना कलंक हा शब्द खूप लागला आहे. ज्यांना हा शब्द लागला आहे, त्यांना मला विचारायचा आहे की तुम्ही लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून भ्रष्टाचाराचा कलंक लावतात. आमच्यावर आरोप करणारे आता स्वतः राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.”
“महाराष्ट्रामध्ये सध्या फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. त्याचबरोबर सरकारचं जनतेच्या प्रश्नांकडं लक्ष नाही. या सर्व गोष्टींमुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सरकार फक्त लोकांच्या दारी जात आहे. मात्र, ते त्यांच्या घरात न जाता फक्त दारातून परत येत आहे. कार्यक्रमासाठी सरकार फक्त लोकांच्या दारी जात आहे”, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | तुमच्यासारख्या भामट्यांमुळे राजकारणाचा दर्जा खालवलायं; चित्रा वाघांनी संजय राऊतांना धारेवर धरलं
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांना ‘कलंक’ हा शब्द एवढा का लागला? – उद्धव ठाकरे
- Chandrashekhar Bawankule | “कलंकित करंटा उद्धव ठाकरे…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
- Dhananjay Munde | छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंना जीवे-मारण्याची धमकी
- Ashish Shelar | जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरवतात; आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले
Original NEWS SOURCE – https://bit.ly/44Ac0wI
Comments are closed.