Devendra Fadnavis | “एका राजाचा एक पोपट…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. यासंदर्भात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांच्या मुंबई भेटीनिमित्त बुधवारी संध्याकाळी उशिरा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर तुफान टोलेबाजी केली आहे.
ठाकरे गटावर टीकास्त्र करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर सातत्याने बेकायदेशीर सरकार चुकीचं सरकार अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन सांगितलं आहे की, शिंदे-फडणवीस सरकार कायदेशीर आहे आणि हे सरकार योग्य आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “सध्या काहीही सुरू आहे. ठाकरे गट म्हणतो आम्ही जिंकलो. मग म्हटलं तुम्ही जिंकले तर बडवा. मात्र, आमचे उद्धवजी राजे-महाराजांपेक्षा कमी नाही. राजाला एक पोपट फार आवडत होता आणि तो पोपट मेला. मात्र, राजाला कोण सांगेल की तो पोपट मेला आहे. कारण राजाला ही माहिती जो देणार त्याचा शिरच्छेद होणार. राजा विचारतो, आमचा पोपट कसा आहे? पोपट एकदम उत्तम आहे. पण काही खात पीत नाही, बोलत नाही आणि मानही हलवत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गटाची अवस्था अशीच झाली आहे.”
उद्धव ठाकरेंना माहित आहे की पोपट मेला. मात्र, तरीही ते सांगतात की 16 आमदार अपात्र ठरणारे 20 आमदार पात्र ठरणार. विधानसभा अध्यक्षांना ते अधिकार दिले आहे. त्याचबरोबर आम्ही कधी कायद्याच्या पलीकडे जात नाही. मात्र तरीही मला असं वाटतंय की कुणीतरी उद्धवजींना सांगा की, उद्धवजी आता पोपट मेला आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | “संजय राऊतांसारखी लोकं एकनाथ शिंदेंनी दिलेल्या तुकड्यावर…”; शिंदे गटाच्या आमदाराचा खुलासा
- Eknath Shinde | सरकारचा मोठा निर्णय ! वर्षातून किमान 4 आठवडे मराठी चित्रपट दाखवण्याची चित्रपटगृहांना सक्ती
- Bhaskar Jadhav | प्रदीप कुरुलकर प्रकरणावरून भास्कर जाधवांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…
- D K Shivakumar | मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित; तर डी के शिवकुमार यांना राहुल गांधींची ‘ही’ ऑफर
- Nana Patole | भास्कर जाधव यांच्या आरोपावर नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले…
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pU0v4a
Comments are closed.