Devendra Fadnavis | “कसब्याच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पुन्हा येऊ”

Devendra Fadnavis kasba by election | पुणे : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीबाबत राज्यातील अनेक लोकांनी लक्ष दिलं आहे. यामुळे हि पोटनिवडणूक महाराष्ट्रात गाजली आहे. कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेद्वार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या निवडणुकीत धंगेकर यांना ११ हजार मतांनी विजयी मिळवला. तर दुसऱ्या बाजूला चिंचवड मतदार संघात दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांना उमेदवारी दिली. त्याचा फायदा भाजपला झाला.

अश्विनी जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आणि अपक्ष उमेदवार नाना काटे अस त्रिकुट पाहायला मिळालं. त्यानंतर अश्विनी जगताप यांनी चांगलीच लीड मिळवत ३६०९१ मतांनी विजयी मिळवला आहे. त्यानंतर अश्विनी जगताप याचं अनेकांनी प्रत्यक्ष तर सामाजमाध्यमांद्वारे अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Tweet ) यांनी देखील ट्विट करत मतदारांचे आभार मानले आहे.

फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार, म्हणाले ‘आम्ही पुन्हा येऊ’!

“कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो.

पण, एक नक्की सांगतो,
आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’! – Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या :