Devendra Fadnavis | कुणालाही पाठीशी न घालता या प्रकरणाची चौकशी होणार; किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कथित व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

We will investigate the matter thoroughly – Devendra Fadnavis

माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “विरोधकांनी मांडलेला हा विषय नक्कीच खूप गंभीर आहे. त्यांच्याकडे ज्या काही तक्रारी आलेल्या असतील त्यांनी त्या आमच्याकडे द्याव्या.

या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करू. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. किरीट सोमय्या आणि विरोधकांनी केलेली चौकशीची मागणी पूर्ण केली जाणार आहे.”

दरम्यान, या प्रकरणी विधिमंडळात आज विरोधकांनी चौकशीची मागणी (Devendra Fadnavis) केली आहे. या प्रकरणावर बोलत असताना अनिल परब म्हणाले, “राजकीय नेत्यांवर जेव्हा खोटे आरोप होतात तेव्हा त्यांना त्यांच्या मुलांसमोर घाणेरडे प्रश्न विचारले जातात.

हा प्रश्न फक्त किरीट सोमय्या यांच्या पुरताच मर्यादित नाही. हा प्रश्न सर्व राजकारण्यांचा आहे. सर्वस्व पणाला लावून लोक या ठिकाणी काम करतात.”

“त्यामुळे कोणाचंही राजकीय आयुष्य उध्वस्त होऊ नये, असंच आम्हा सर्वांना वाटत आहे. म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे”, असही ते यावेळी म्हणाले.

किरीट सोमय्या यांच्या या व्हिडिओनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या व्हिडिओवरून विरोधक सोमय्या यांच्यावर टीका करताना दिसत (Devendra Fadnavis) आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44SeoiP