Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? राऊत बोलण्यालायक नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप-सेनेत विविध मुद्द्यांवरून वाद होताना दिसत आहेत. तर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बाणेदार बोलण्यावरून वाद-प्रतिवाद होतात. अशाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खोचक टोला मारला आहे.

कोण संजय राऊत?-देवेंद्र फडणवीस (Who is Sanjay Raut?-Devendra Fadnavis)

माध्यमांशी बोलताना कोण संजय राऊत? असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. “बेळगावचा जो विषय आहे. त्यामध्ये आपण प्रचाराला जावं. असा आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करावा आणि महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगावचा संबंध आहे असेही संजय राऊत यांचे म्हणणं आहे.” असा प्रश्न पत्रकाराने फडणवीस यांना विचारला होता.

या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “कोण संजय राऊत? ते काय राष्ट्रीय नेते आहे का? तुमच्या एवढ्या मोठ्या चॅनलवर बोलण्यालायक नाही ते.” असं म्हणत फडणवीसांनी संजय राउतांवर शब्दांचा मारा केला आहे.

राऊत कुणालाही न भिता थेट बोलतात त्यामुळे वाद होतात असं सत्ताधारी म्हणतात अशात फडणवीसांनी कोण संजय राऊत म्हणल्याने परत वाद वाढण्याचे चिन्ह आहेत.

महत्वाच्या बातम्या