Devendra Fadnavis | “…तर कारवाई करु” ; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा

Devendra Fadnavis | मुंबई : भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर टीका केली. त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. तुरुंगात असताना भीतीपोटी माफीनाम्यावर स्वाक्षरी करून सावरकरांनी ब्रिटीशांना मदत केली आणि महात्मा गांधी आणि इतर समकालीन भारतीय नेत्यांचा विश्वासघात केला, असा दावा राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. फडणवीस म्हणाले, “अशा लोकांवर कारवाई करुन काही फायदा नसतो. अनेक केसेस राहुल गांधी भोगत आहेत. ते सध्या बेलवर आहेत. अनेकवेळा कोर्टात हजर राहत नाहीत म्हणून त्यांटे वॉरंट निघतात. ते खोट बोलत आहेत, त्याचे उत्तर आम्ही देऊ. माध्यम प्रसिद्धी मिळावी म्हणून राहुल गांधी असे वक्तव्य करत आहेत. सुरवातीला त्यांच्या यात्रेला प्रसिद्धी मिळाली नाही. आता प्रसिद्धी मिळावी म्हणून ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

“राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कायद्याच्या चौकटीत राहून काही केलं तर ठीक आहे. पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी काही केल. तर आम्हाला कारवाई करावी लागेल. त्यांच्या यात्रेला आम्ही सुरक्षा दीली आहे. सुरक्षितपणे त्यांची यात्रा आम्ही बाहेर काढू. पण महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा त्यांनी प्रयत्न करु नये,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला देखील टोला लगावला. “दरवेळी राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन सावरकरांवर वाटेल तसं बोलतात. शिवसेनेचे नेते हे ते गेल्यावर काहीतरी एखादं वाक्य बोलतात. बाकी सत्तेसाठी ते त्यांच्यासोबत आहे. हे सावरकरांकरिता सत्ता कधीच सोडू शकत नाही”, असे फडणवीस म्हणाले.

राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्ष बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने वंदना सुहास डोंगरे यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत ‘स्वातंत्र्यसैनिकाची बदनामी आणि स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या’प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ५०० आणि ५०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी-

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, वीर सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिले की, “मै आपका नौकर रहना चाहता हु” आणि त्यावर स्वाक्षरी केली. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली. त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचा पत्रावर सही करून विश्वासघात केला.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.