Devendra Fadnavis | “तुम्हाला मातोश्रीवरून वरळीला जाता आलं नाही अन् तुम्ही…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Devendra Fadnavis | सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहे. त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. मोदींना अमेरिका नाही तर मणिपूरला जाण्याची आवश्यकता आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

You have no right to talk about Modi – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मणिपूरसाठी आमचे अमित शाह (Amit Shah) पुरेसे आहे. आम्हाला आमच्या तिजोऱ्या भरायच्या नाही तर आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आमच्यावर टीका करणारे ते नेते मातोश्रीवरून वरळीला जाऊ शकले नाही. त्यामुळे तुम्हाला मोदींबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही.”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर मोदींनी अनेक प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकरी सन्मान योजनेमध्ये राज्याचे 06 आणि केंद्राचे 06 असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.”

दरम्यान, “मणिपूर पेटलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिकेला गेले आहे. हिम्मत असेल तर मोदींनी मणिपूरला जाऊन दाखवावं. अमेरिकेत जाऊन भाषण देण्यापेक्षा आपल्या देशातील मणिपूरला मोदींनी जायला हवं”, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/devendra-fadnavis-said-to-uddhav-thackeray-that-you-could-not-go-to-worli-from-matoshree/?feed_id=45637

You might also like

Comments are closed.