Devendra Fadnavis | “…तेव्हा उद्धव ठाकरेंची नैतिकता कुठे होती?”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालेला असून ठाकरे गटाच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे.

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रतिक्रिया दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारवर पदाचा राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. तेव्हा तुमची नैतिकता कुठं होती? उद्धव ठाकरे यांना नैतिकतेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.”

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेमुळे राजीनामा दिला नव्हता. त्यांनी भीतीमुळे राजीनामा दिला होता. कारण त्यांना त्यांची लोकं सोडून गेली होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला नैतिकतेबद्दल शिकवू नये.”

निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया (Uddhav Thackeray’s reaction after the result)

उद्धव ठाकरे म्हणाले, “अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांवर सोपवला असला तरी पक्षादेश आमचाच राहील. त्याचबरोबर अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मी करणार आहे. कारण माझी लढाई सत्तेसाठी नाही तर माझी लढाई जनतेसाठी आणि देशासाठी आहे. मी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो. जसा मी राजीनामा दिला होता तसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही द्यावा आणि निवडणूक लढवण्यासाठी मैदानात यावं.”

महत्वाच्या बातम्या