Devendra Fadnavis | “त्यांनी जर तोंड काळ केलं नसतं तर…”; फडणवीसांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला

Devendra Fadnavis | जळगाव: ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर जाणार आहे. या कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवू, असं वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं होतं. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंनी जमिनीत काळ तोंड केलं नसतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

Eknath Khadse has got a new owner – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “आम्हाला काळे झेंडे दाखवून काय सिद्ध होणार आहे? सध्या एकनाथ खडसे यांना नवीन मालक मिळाला आहे. तो नवीन मालक जे सांगेल तसं खडसे वागतात. जर त्यांनी जमिनीमध्ये तोंड काळ केलं नसतं, तर त्यांच्यावर काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती. ते परिवारातच राहिले असते. त्यांना नवीन मालकाकडे जावं लागलं नसतं.”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “आम्ही अशा काळ्या झेंड्यांना घाबरणार नाही. आम्ही जनतेची लोकं आहोत. आम्ही जनतेसाठी काम करत आहोत. जळगावची जनता आमच्यासोबत आहे.”

दरम्यान, जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं  आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमापूर्वी एकनाथ खडसे यांनी मोठं  वक्तव्य केलं. एकनाथ खडसे म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मारायला लागला आहे. त्याचबरोबर या जिल्ह्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं. सरकार कांदा, कापूस आणि केळी उत्पादकांकडे दुर्लक्ष करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

 
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NQw7BB