Devendra Fadnavis | “त्यावेळी मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच सीपींना दिलेलं”; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

Devendra Fadnavis | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आणि मागील सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

“एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनीच मला ‘मातोश्री’चे दरवाजे बंद केले. मात्र वहिनी मला परवा एका कार्यक्रमात भेटल्या होत्या तेव्हा मी म्हटलं की उद्धवजींना नमस्कार सांगा कारण राजकीय दृष्ट्या मी उद्धवजींचा विरोधक आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती वैर जपणारी नाही. मी त्या संस्कारांनीच वागतो”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे आणि तुमच्यात खूपच कटुता आली? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्याकडून कुठलंही वैर नव्हतं. पण ‘मातोश्री’चे दरवाजे मला उद्धव ठाकरेंनी बंद केले. 5 वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही. मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होत”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

“मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत. महाविकास आघाडीमध्ये संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आलं होतं. मात्र माझ्या विरोधात त्यांना काहीही सापडलं नाही. माझ्याकडून कुठलीही कटुता आजही नाही. राजकीय दृष्ट्या मी त्यांचा (उद्धव ठाकरे) विरोधक आहे. पण व्यक्तिगत पातळीवर काहीही वैर नाही”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.