Devendra Fadnavis | मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने अनेक योजना मांडल्या. यापैकी काही योजनांसाठी ‘पुरेशी तरतूद’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘पुरेशी तरतूद’ म्हणजे काय ते स्पष्ट करावं. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांच्या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीसांनी .
“दादा तुम्ही जरा कडक आहात”
“दादा तुम्ही म्हणालात ‘पुरेशी तरतूद’ काय म्हणजे काय ते समजलं नाही. पण दादा हा केवळ तुमच्या आणि माझ्या भाषेतला फरक आहे. तुम्ही जरा कडक आहात त्यामुळे तुम्ही आवश्यक तरतूद असा शब्द वापरता. तुमचे याआधीचे अर्थसंकल्प पाहा”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis replied to Ajit Pawar
त्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांनी 2021-22 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी वाचून दाखवल्या. त्यात आवश्यक तरदूद असा शब्द सातत्याने आला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
“दादा तुम्ही कडक स्वभावाचे असल्यामुळे तुम्ही ‘आवश्यक’ असा शब्द लिहिलात आणि मी स्वभावाने थोडा मृदू असल्याने मी ‘पुरेशी तरतूद’ असा शब्द लिहिला. एवढाच फरक आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये फार काही फरक नाही”, असं सांगत फडणवीसांनी दोघांच्या अर्थसंकल्पातील ‘चिन्हांकित’ आणि ‘प्रश्नांकित’ हे दोन वेगवेगळे शब्द असल्याचं दाखवून दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Shivsena | महाराष्ट्राच्या सत्तासंषर्घाचा लढा अंतिम टप्प्यात; घटनापीठाकडून आज, उद्याची वेळ राखीव
- Ajit Pawar | “या मंत्र्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी?”; अजित पवार आक्रमक
- Gulabrao Patil | “…म्हणून आम्ही पवारांना घाबरुनच असतो”; गुलाबराव पाटलाचा मिश्किल टोला
- Weather Update | ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट
- Job Opportunity | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू