Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं परमबीर सिंग यांचं निलंबन मागं घेण्याचं कारण, म्हणाले…

Devendra Fadnavis | मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यावरील सर्व आरोप शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आले आहेत. शिंदे सरकारने परमबीर सिंग यांना सर्व आरोपांमधून मुक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परमवीर सिंग यांचं निलंबन मागं घेण्याचं कारण सांगितलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कॅट (Central Administrative Tribunal) ने अहवाल दिला आहे. या अहवालानुसार, कॅटने परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून त्यांची डी देखील बेकायदेशीर ठरली आहे. कॅटने त्यांचे निलंबन देखील रद्द केले आहे. आम्ही फक्त या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी अडचणीत सापडली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांना निलंबित करण्यात आलं होतं. आज राज्य सरकारने त्यांचं निलंबन मागं घेतलं आहे.

परमबीर सिंग यांना खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरवर्तुणुकीच्या अनेक खटल्यांचा सामना करावा लागला होता. कारमायकल रोडवर बॉम्ब प्रकरणाच्या चुकीच्या हाताळणीमुळे त्यांना मुंबई पोलीस प्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या