Devendra Fadnavis | “पराभवानंतर आम्ही त्याचा पोस्टमार्टम करतो”; पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीस पहिल्यांदाच पुण्यात

Devendra Fadnavis | पुणे : राज्यात सर्वांचं लक्ष लागून असणाऱ्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदाच पुणे दौरा केला आहे. या दौऱ्यावेळी त्यांनी झालेल्या पोटनिवडणुकीविषयी भाजपची पुढील रणनिती आणि आगामी निवडणुकांविषयी काय असणार आहे यावेळी त्यांनी सडेतोड शब्दात विरोधकांना समजावून सांगितले आहे.

Devendra Fadnavis Talk about Pune by election 

“एखादी निवडणूक जिंकलो किंवा हरलो तर त्याने काही फार फरक पडत नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या विजय किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मुल्यमापन किंवा दुसर्‍या भाषेत सांगायचे झाल्यास त्याचा पोस्टमार्टम करीत असतो. ते आम्ही केल असून, आम्ही काळजी घेऊ”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पोटनिवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

“या निवडणुकीत पराभव झाला असला तरी मतदारांचा कौल मान्य केला आहे. आगामी काळातील निवडणुकीबाबत या निकालाचा आम्हाला विचार करता येईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.