Devendra Fadnavis | “भास्कर जाधव दम देऊन बोलतात”; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Devendra Fadnavis | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जुगारुन आज प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. भास्कर जाधवांच्या या प्रतिक्रियेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले आहेत.

भास्कर जाधव काय म्हणाले?

“अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही. आमचं मुख्यमंत्रीपद गेलं, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची सुरक्षा काढण्यात आली, अशी गोष्टींना आम्ही घाबरलो नाही, तर यांच्या व्हीपला आम्ही कसे घाबरणार? असे कित्येक व्हीप आम्ही बघितले आणि गेले”, अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.

भास्कर जाधव यांनी ‘माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही’ असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. तसेच ‘काय चाललं आहे?’ असा प्रश्न विचारला. यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस भास्कर जाधवांवर आक्रमक (Devendra Fadnavis aggressive on Bhaskar Jadhav)

“भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही. हे योग्य नाही. सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सुनील प्रभूंची प्रतिक्रिया (Sunil Prabhu’s reaction)

“आमच्या उपस्थितीसंदर्भात जो व्हीप बजावयाचा, तो आम्ही बजावणार आहे. ते आमच्यावर व्हीप बजावू शकत नाहीत. शिंदे गटाच्या वकीलांनी न्यायालयात सांगितलं की, ‘कोणताही व्हीप बजावणार नाही’. मग, न्यायालयाला सांगूनही व्हीप बजावत असतील, तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. न्यायालयाचा अवमान त्यांनी केला आहे, असं सांगू. न्यायदेवता आम्हाला न्याय देईन,” असं सुनील प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-