Devendra Fadnavis | महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिली – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | मुंबई : भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सीमा समस्या, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडी उद्या १७ डिसेंबरला महामोर्चा काढणार आहे. या मोर्चाला परवानगी दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडीचा मोर्चा शांतपणे व्हावा, त्याला परवानगी दिली आहे. लोकशाही पद्धतीने कुणाला विरोध करायचा असलेत तर तो विरोध ते करतील. आम्ही फक्त कायदा व सुव्यवस्था राहीले पाहीजे, याकडे लक्ष देऊ.”
“आशिष शेलार यांनी देखील आंदोलनाची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते हे वारकरी संतांबद्दल बोलत आहेत. राम कृष्णा यांच्याबद्दल त्यांचे उद्गार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत देखील त्यांचे विधान आहे. यामुळे देखील लोकांच्या मनात संताप आहे. तो व्यक्त करावा लागेल,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आशिष शेलार यांची आंदोलनाची घोषणा –
भाजप संजय राऊत यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाली आहे. हिंदू-देवदेवतां व महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मुंबई भाजपा तर्फे उद्या संपूर्ण मुंबईमध्ये ‘माफी मांगो’ आंदोलन करणार असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
“डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील दोन पुस्तके संजय राऊत यांना पाठवले आहे. संजय राऊत यांनी संपूर्ण अभ्यास करावा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला?, यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुरु आहे. हे सर्व जाणीवपूर्वक सुरु आहे,” असे शेलार म्हणाले.
बाबासाहेबांचा विचार असाच संपवता येणार नाही. त्यावर प्रश्न निर्माण करता येणार नाहीत. संजय राऊत यांना माफी मागावी लागेल, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्याविरोधात भाजप उद्या माफी मागो आंदोलन करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs BAN | बांगलादेशविरुद्ध कुलदीप यादवने केला ‘हा’ पराक्रम
- Maha Vikas Aghadi vs Bjp | भाजपचं उद्या ‘माफी मागो’ आंदोलन ; महाविकास आघाडीच्या मोर्चाला देणार उत्तर
- Sushma Andhare | “मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण त्याआधी…”; सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
- IPL vs PSL | आयपीएलबद्दल मोहम्मद रिझवानने केलं खळबळजनक विधान, म्हणाला…
- Sudha Murti | श्रेया घोषाल संग ‘बरसो रे मेघा’ गाण्यावर थिरकल्या सुधा मूर्ती, पाहा व्हिडिओ
Comments are closed.