Devendra Fadnavis | माविआच्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरलं; सत्ता संघर्षाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने आमच्या सरकारला घटनात्मक सरकार ठरवलं आहे. हा लोकशाहीचा विजय आहे असं मी नमूद करतो. कोर्टाच्या निर्णयावर आम्ही पूर्णपणे समाधानी असून महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फिरलं आहे.”

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रतिक्रिया दिली होती. नैतिकतेच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर उत्तर देत फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजपसोबत निवडून आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केलं. तेव्हा तुमची नैतिकता कुठे होती? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले? (What exactly did Uddhav Thackeray say?)

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो. जसा मी राजीनामा दिला होता तसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही द्यावा आणि निवडणूक लढवण्यासाठी मैदानात यावं.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.