Devendra Fadnavis | “मी सनसनाटी करण्यासाठी कधीही वक्तव्य करत नाही”; राऊतांच्या वक्तव्यावरुन फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis  | मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर आता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्यात चांगलीच जुंपली आहे.

“फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय”

“देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो”, असे संजय राऊत म्हणाले आहेत. राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता फडणवीसांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर

“मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी कधीही वक्तव्य करत नाही. जे वक्तव्य मी करतो त्याचे माझ्याजवळ नेहमीच पुरावे असतात, आता ती वेळ नाही योग्यवेळी सगळ्या गोष्टी सांगेन”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Sanjay Raut Criticize Devendra Fadnavis

“महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर, घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होते तेव्हा अशावेळी विरोधी पक्ष किंवा सरकार बनवू इच्छिता त्यांच्याशी बोलले असतील, बोलले होते. ठीक आहे, पण देवेंद्र फडणवीस इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहेत,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.