Devendra Fadnavis | “मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार”; शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

Devendra Fadnavis | मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीची नव्याने चर्चा होत आहे. हा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला होता.

देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यानंतर शरद पवार ‘देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट हटवण्यास मदत झाली, असे नवे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. पवारांच्या या वक्तव्यावर आता पन्हा देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

“मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार” (Devendra Fadnavis comment on oath ceremony)  

“हळूहळू सगळे गौप्यस्फोट होत आहेत. मी जे बोललो तेच कसं खरं होतं, हे तुम्हाला हळूहळू समजत आहे. मात्र सध्या तुम्हाला अर्धेच समजलेले आहे. अर्धे समजायला अद्याप वेळ आहे,” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“मी काहीही बोललो की समोरून आणखी दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे. काळजी करू नका. तुम्हाल सगळे समजेल,” असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Sharad Pawar talk on Fadnavis Annd Ajit Pawar Swearing 

पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.