Devendra Fadnavis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची ‘ती’ मागणी मान्य करणार का?

Devendra Fadnavis | मुंबई: राजकीय वर्तुळामध्ये दररोज काही ना काही घडामोडी सुरूच असतात. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मागणी केली आहे. ती मागणी मुख्यमंत्री मान्य करणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. फडणवीस यांच्या मागणीवर एकनाथ शिंदे काय उत्तर देतील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप आणि काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून आधीच आमने-सामने असतात. आता पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 मार्च रोजी याबाबत पत्र लिहिले होते. त्यांनी या पत्रामध्ये कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सी लिंक आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावे देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या मागण्यांपैकी कोस्टल रोडची मागणी एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे. फडणवीस यांच्या आणखी दोन मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. तर वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे. त्याचबरोबर मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केली होती.

महत्वाच्या बातम्या