Devendra Fadnavis | “‘या’ विमानतळाचं श्रेय नारायण राणेंचंच”; चिपी विमानतळाच्या श्रेयवादाला पुन्हा तोंड फुटले

Devendra Fadnavis | सिंधदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे आज आंगणेवाडी येथिल यात्रेनिमित्ताने आले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंवर टीका करत श्रेयवादाला पुन्हा तोंड फोडले आहे. त्यांनी चिपी विमानतळावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारनं अडीच वर्षात कोकणासाठी काही केलं नाही. काही लोकांना दोनवेळा उद्धाटन करण्याचा शौक असतो. चिपी विमानतळाचं श्रेय नारायण राणे यांचंच आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आंगणेवाडी येथील सभेत फडणवीस बोलत होते.

“वादळावेळी ठाकरे सरकारने कोकणाला मदत केली नाही. महाविकास आघाडीचे कोकणावरील प्रेम बेगडी होतं.ज्यांनी एक वीटही रचली नाही त्यांनी उद्घाटन केलं” अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“आमच्या सरकारनं चांदा ते बांधाच्या योजनेला आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. रस्ते, मुलभूत सोयी याकरिता निधी दिला. काजू, नारळ, सुपारी, यासंदर्भातील विविध योजना त्या काळात आणल्या. पण, यासारखी एकही चांगली योजना उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आणता आली नाही”, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा निष्काळजीपणा दाखला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.