Devendra Fadnavis | राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहे. सर्वांना 2024 निवडणुकीची ओढ लागली आहे. अशात राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं भाजपानं जाहीर केलं आहे. त्यामुळे भविष्यात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

Who will be the next chief minister of the state?

रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भावी मुख्यमंत्र्याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वगुणांविषयी ठाम भूमिका मांडली आहे. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ घेतील, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/433EpKD