Devendra Fadnavis | “राष्ट्रवादीची ही परंपराच, पण कोणाला वाटलं तरी होतं का ठाकरे मुख्यमंत्री होतील”

Devendra Fadnavis | पुणे : राज्यात 2024 च्या निवडणुकांना आणखी खूप अवधी असतानाही राष्ट्रावादी काँग्रेसकडून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर समोर आले आहे. यावरुन विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली.

त्यातच नुकताच पक्षाच्या कार्यालयाबाहेर सुप्रिया सुळे यांचा नुकताच एक बॅनर लावल्याचे समोर आले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

फडणवीसांनी पवारांना डिवचलं

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशी पद्धत आहे की भावी म्हणून सांगत असतात. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. बघा असं आहे की मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे. कधीही काहीही होऊ शकते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं कधी कुणाला वाटलं होतं का ? ते बनले त्यामुळे ज्याला-ज्याला भावी वाटतोय त्याला-त्याला शुभेच्छा आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कोणाला वाटलं होतं का?”

“माझ्या अनुभवातून मी शिकलोय की कधीही काहीही होऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी म्हणून नेत्यांचा उल्लेख करण्याची पद्धत आहे. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री, माझ्या शुभेच्छा आहेत. मी माझ्या अनुभवातून शिकलो की कधीही काहीही होऊ शकतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं होतं का? ते बनले. त्यामुळे ज्याला ज्याला जो जो भावी म्हणून वाटतो, त्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत”, असं म्हणत राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावत फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.