Devendra Fadnavis | “विधानसभा अध्यक्षांवर दबाव…”; ठाकरे गटाच्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने काल जाहीर केला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असून त्यासाठी पुरेसा वेळ देखील दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी पंधरा दिवसात हा निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ठाकरे गटाला उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सर्व अधिकार आणि पुरेसा वेळही दिला आहे. त्यामुळे अध्यक्षांवर कुणी दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. तरीही कुणी अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते व्यक्ती मुक्त आणि न्याय प्रक्रियेच्या विरोधात आहे.”

विधानसभा अध्यक्ष हे एक चांगले वकील आहेत. त्यामुळे ते कायद्यानुसारच निर्णय घेतील, सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देत फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. तेव्हा तुमची नैतिकता कुठं होती? उद्धव ठाकरे यांना नैतिकतेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.”

महत्वाच्या बातम्या