Devendra Fadnavis | विरोधकांच्या पोटदुखीवर औषध देण्यासाठी डॉ. एकनाथ शिंदेंना आणलायं – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | नाशिक: आज नाशिक शहरामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस उपस्थित आहे. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकावून टीका केली आहे. विरोधकांची पोट दुखी कमी करण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिंदे यांना आणलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “आम्ही चांगलं काम करत आहोत तर लोकांच्या पोटात दुखत आहे. लोकांसाठी योजना राबवून त्यांना लाभ मिळवून दिला तरी लोकांच्या पोटात दुखतं.

शासन आपल्या दारी कशासाठी? लोक जमा कशासाठी करतात? असे प्रश्न काही लोक आमच्यावर उपस्थित करतात. पण त्यांना कोण सांगणार लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक आमच्या कार्यक्रमांना येतात.”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “आमच्या या कार्यक्रमांमुळे लोकांच्या पोटात का दुखतं? पण या लोकांनी चिंता करायची गरज नाही.

कारण कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्या पोट दुखीवर औषध देण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिंदे यांना घेऊन आलो आहोत. एकनाथ शिंदे यांचे उपचार कमी पडले तर अजितदादा आहेतच. आम्ही सर्वांच्या पोटदुखीवर उपचार करणार आहोत.”

Will take Maharashtra to number one in the country – Devendra Fadnavis

“दोन झेंडे दिसत आहे, असं अजित पवार मागे म्हणाले होते. मात्र, आता तिसरा झेंडा पण आमच्यासोबत आला आहे. हे तिन्ही झेंडे मिळून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर घेऊन जातील आणि आम्ही हे करून दाखवणारच आहोत. यासाठी जनता देखील आम्हाला प्रतिसाद देत आहे”, असही ते (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NWG1A6