Devendra Fadnavis | शिंदे गटात नाराजी? शिंदेंच्या बैठकीत रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांची हजेरी
Devendra Fadnavis | ठाणे: सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारावरून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरू होती. शिंदे गटाच्या या बैठकीला रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. शिंदे गटाच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा दाखल झाल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
The reason for Eknath Shinde and Devendra Fadnavis’ late night meeting is not yet clear
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रात्रीच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, यांची ही भेट खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सामील झाल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या विषयाच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadnavis) सातत्यानं बैठका सुरू आहेत.
खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली होती.
त्याचबरोबर काल (13 जुलै) सकाळी वर्षा बंगल्यावर शिंदे-फडणवीस-पवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात वेगळी बैठक झाली. त्यानंतर शिंदे-फडणवीस यांची रात्री उशिरा वेगळी चर्चा झाली.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | अखेर मुहूर्त लागला! पुढील 24 तासात अजित पवार गटाला होणार खातेवाटप
- Ambadas Danve | “अजित पवारांना मुख्यमंत्री करा अन् एकनाथ शिंदेंना…”; अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य
- Nikhil Wagle | नवाब मलिक अजितदादांसोबत गेले तर ताबडतोब जामिनावर सुटतील – निखिल वागळे
- Vijay Wadettiwar | देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही टेरर नेते – विजय वडेट्टीवार
- Nana Patole | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3rxqCi9
Comments are closed.