Devendra Fadnavis | “संजय राऊत दुर्दैवाने एका पक्षाचे…”; देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका

Devendra Fadnavis | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे भाजप आणि शिंदे गटाविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला कारण्यासाठी गुंडाला सुपारी दिली असा आरोप केलेला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीला आणि पक्षफुटीला भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) हेच जबाबदार असल्याचा दावाही संजय राऊत यांच्याकडून केला जातो. यावरच आता देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या या आरोपाला सडेतोड उत्तर दिलं आहे.

“दुर्दैवाने ते एका पक्षाचे प्रवक्ते” (Devendra Fadnavis replied to Sanjay Raut)

“संजय राऊत यांना माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. मात्र अलिकडच्या काळात संजय राऊत जे बोलत आहेत, ते फार गांभीर्याने घेण्यासारखे नाही. दुर्दैवाने ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे राऊत यांनी बोलताना काळजी घेणे गरजेचे आहे,” असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना दिला आहे.

Sanjay Raut Wrote Letter to Devendra Fadnavis

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी राजा ठाकूर नावाच्या गुंडाला सुपारी दिली होती, असे राऊत म्हणाले आहेत. या सर्व घटनेचा तपास व्हावा अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

‘ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणं आवश्यक आहे,’ असे संजय राऊत यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात लिहले आहे.

महत्वाच्या बातम्या-