Devendra Fadnavis | सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तरी मोदींचा पराभव करू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | मुंबई: राज्यातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात सापनाथ आणि नागनाथ यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप केले जात आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवाल आणि ठाकरे यांचा उल्लेख सापनाथ आणि नागनाथ म्हणून केला आहे.

Devendra Fadnavis’ reaction to Arvind Kejriwal and Uddhav Thackeray’s meeting

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “सापनाथ आणि नागनाथ एकत्र येऊन एकच विषय पसरवणार आहे. ज्यांच्यासोबत पाच वर्षे होते त्यांच्याशी बोलायचं नाही. त्यांना वेळ द्यायचा नाही. मात्र ज्यांच्या नावाने राजकारण केले, ज्यांना विरोध केला त्यांनाच मातोश्रीवर बोलवायचं आणि चर्चा करायची.”

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या वक्तव्याला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले, “सापनाथ आणि नागनाथ यांची या देशात पूजा केली जाते. त्यामुळे तुम्हाला त्यात त्रास व्हायचं काही कारण नाही.” तुम्ही हिंदू आहात ना?, असा खडा सवाल देखील संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

“कितीही सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तरी सरकार आमचचं येणार आहे. कारण तुमच्याकडे सापनाथ आणि नागनाथ असले, तरी आमच्याकडे एकनाथ आहे. त्यामुळे आमचचं युतीचं सरकार येणार”, असं उदय सामंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45u0xA6

You might also like

Comments are closed.