Devendra Fadnavis | “सावरकर बनण्याची तुमची औकात नाही”; देवेंद्र फडणवीसांची गांधींवर टीका

Devendra Fadnavis | नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यानच्या एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भाष्य केलं होतं. त्यानंतर भाजपसह (BJP) RSS ने राहुल गांधींना (Rahul Gandhi) चांगलंच धारेवर धरलं होत.  राजकीय वर्तुळात देखील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. तर आज (27 मे ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूर दौऱ्यावर आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर लिहलेल्या ‘मृत्युंजयाचा आत्मयज्ञ’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) टीकास्त्र सोडलं आहे.

सावरकर बनण्याची तुमची औकात नाही

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, सावरकर हे एक विज्ञाननिष्ठ आणि संस्कृतीची जाण असणारे नेते होते. ज्या व्यक्तीला तुरुंगातील छोट्याशा खोलीत दिवसभर कष्ट करून देखील महाकाव्य सुचले अशा व्यक्तीचा अंदाज राहुल गांधींना कधीच येणार नाही. जेव्हा-जेव्हा राहुल गांधी ( Rahul Gandhi) म्हणतात ना मी सावरकर नाही, तेव्हा मला म्हणावं वाटत आमच्या नागपुरी भाषेत की, “सावरकर बनण्याची तुमची औकात नाही”. अशा शब्दात फडणवीसांनी राहुल गांधींवर ( Rahul Gandhi) टीका केली आहे.

Devendra Fadnavis Commented On Rahul Gandhi

दरम्यान, फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, मी राहुल गांधीचे ( Rahul Gandhi) आभार मानतो, कारण या जनतेला जेव्हा सावरकरांचा विसर पडतो. तेव्हा – तेव्हा राहुल गांधी येतात आणि सावरकरांबद्दल बोलतात. जे काही ते बोलतात त्यामुळे सर्वांना पुन्हा जाग येते, पुन्हा समाज पेटून उठतो. खर तर त्याचे मी आभार मानतो. ते स्वतःच म्हणतात मी सावरकर नाही म्हणून तर सांगतोय की तुमची क्षमता नाही स्वातंत्रवीर सावरकर बनण्याची असं देखील देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रमात म्हणाले. फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) या टीकेमुळे आता काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं रंजक ठरेल.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OJadRE