Devendra Fadnavis | सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

Devendra Fadnavis | मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला तीन वर्ष झाले आहे. वांद्रे इथल्या राहत्या घरी तो मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असा अंदाज बांधण्यात आला होता. तीन वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधित मोठा खुलासा केला आहे.

In Sushant Singh Rajput’s case, there was no concrete evidence earlier

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये आधी कोणते ठोस पुरावे नव्हते. मात्र, काही लोकांनी त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्याचं सांगितलं आहे. आम्ही त्या लोकांशी बोलून त्यांना पुरावे पोलिसांना देण्यास सांगितलं आहे. सध्या त्या पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर जास्त बोलणार नाही. योग्य वेळ आली की मी या मुद्द्यावर बोलेन.”

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बिहार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाची सीबीआयने (Devendra Fadnavis) चौकशी केली होती. सुशांतच्या निधनानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. रिया सुशांतला ड्रग्स पुरवत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणावरून तिला अटक देखील करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर ड्रग्सचा अँगल समोर आला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं या प्रकरणाची सखोल तपासणी (Devendra Fadnavis) केली होती. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यानं आत्महत्या केलं असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NTidP6