Devendra Fadnavis | “16 आमदार अपात्र ठरणार नाही”; अजित पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवला आहे. 16 आमदारांबाबत नार्वेकर काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले, “शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार नाही. हे 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही.” अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर पवारांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी याबद्दल काही बोलू शकत नाही. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आलं आहे. या प्रकरणावर जो काही निर्णय होईल तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेतील.”
“एक अभ्यासक, एक वकील आणि पंचवीस वर्षे विधानसभेत कार्य केलेली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की, महाविकास आघाडीला आता समजलं आहे की पोपट मेला आहे. तरीदेखील तो हातपाय आणि मान हलवत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी ते बोलतात. कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा दाखवावी लागत आहे”, अशी खोचक टीका फडणवीस यांनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | मोचा चक्रीवादळामुळे राज्यात येणार उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज
- Rahul Narwekar | 16 अपात्र आमदारांचं काय होणार? मुंबईत पोहोचताच नार्वेकर म्हणाले…
- Ambadas Danve | राज्यातील दंगलींना राज्य शासन जबाबदार?; अंबादास दानवे यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
- Gulabrao Patil | “… म्हणून मी उद्धव ठाकरेंना सोडलं”; ठाकरेंसोबत गद्दारीच्या आरोपावर गुलाबराव पाटील यांचं स्पष्टीकरण
- Chandrakant Khaire | महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली म्हणजे भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप
Comments are closed.