‘देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही’; चंद्रकांत पाटील

पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असं म्हटलं आहे. आम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताही नेता फिरला नसेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ते पूढेे म्हणाले, “नितीनजी आम्हा सर्वांचे पालक आहेत. आई जशी मुलाला म्हणते ना संभाळून जा, गाडीतून हात बाहेर काढू नकोस, अशा भूमिकेमधून ते सांगतात. ते टीका करत नाहीय. ते फक्त काम करताना संभाळून करा असं सांगत आहेत,” असं मत पाटील यांनी व्यक्त केलं. भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांना दिलेला सल्लावर ते बोलत होते. तसेच, आम्ही करोनासंदर्भातील सगळं काम संभाळून करतोय असंही पाटील म्हणाले. कार्यक्रमांची संख्या आम्ही फार मर्यादीत ठेवलीय असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

भाजपा नेत्यांची मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना रसद पुरवली जात असून नागपूर कनेक्शनसंदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना, “सचिन सावंत यांनी आरोप करू नयेत पुरावे द्यावेत,” असं पाटील म्हणाले. तसेच अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना नैराश्य, मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशी टीका केल्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना, “चव्हाण यांना खरं बोलण्याचा राग आला,” असं पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा