देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारसाठी गणरायाकडे घातलं ‘हे’ साकडं

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस राज्यातील सर्व धार्मिक मंदिर बंद करण्यात आलीयेत. यानंतर मंदिर उघडण्याच्या भूमिकेवर राज्यातील विरोधी पक्षाने सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. तसेच गणरायाच्या चरणी साकडं देखील घातलय.

देशभरात मंदिरे सुरू आहेत. महाराष्ट्रातच बंद आहे. सरकारने हवं तर नवीन नियमावली लागू करावीत आणि त्यानूसार राज्यातली मंदिर सुरू करावीत. त्यामुळे गणरायाने सरकारलाही सुबुद्धी द्यावी म्हणून मी गणरायला साकडे घालत आहे, असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी केवळ यासाठी आहे की, आम्ही हिंदू आहोत. आमचे 33 कोटी देव आहेत. सगळीकडे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत. कुणी फुलं, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकतंय. मंदिरांवर अवलंबून असलेले पुजारी, तिथले सेवक आहेत.

या दोन वर्षाच्या काळात या सगळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की मदिरालय सुरू होऊ शकतं तर मंदिर का नाही? सरकारनं हवं तर नियमावली लावावी आणि मंदिरं सुरू करावीत. आज देशभरातील मंदिरं सुरू आहेत. फक्त महाराष्ट्रातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे गणरायाने सरकारलाही सुबुद्धी द्यावी अशी, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा