अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केला गौप्यस्फोट!

- Advertisement -
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय आपल्यासमोर चर्चिलाच गेला नव्हता. तसेच अशाप्रकारचे कुठलेली आश्वासन शिवसेनेला दिले गेले नव्हते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Loading...
Related Posts
- Advertisement -
शिवसेनेशी युती करताना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबत कुठलेही आश्वासन आम्ही दिले नव्हते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातून शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तावाटपावरून तिढा निर्माण झाला होता.
Loading...
उध्दव ठाकरे यांनी एकही फोन केला नाही, त्यांची आघाडीसोबतच चर्चा – देवेंद्र फडणवीस @inshortsmarathi https://t.co/TAaH2SGp41
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) November 8, 2019