सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे संजय राऊतांचे नवे नेते : फडणवीसांचा टोला

नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसला वगळून भाजपविरोधात एक सक्षम पर्याय उभा करावा लागेल, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले होते. यावरून शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली असून काँग्रेसला सक्षम विरोधीपक्ष असल्याचे म्हटले आहे.

त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांचे नेतेच बदलल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता टीका केलीय. सामना आणि सामनाच्या संपादकाचे केद्र बिंदू बदलले आहेत.

सुरवातीला त्यांचे नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते, त्यानंतर पुढे त्यांचे नेते माननीय शरद पवार साहेब होते, आणि आता अलीकडच्या काळात त्यांचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झाले आहेत. तसेच ते काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतायत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा जन्मभर प्रखर विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून हे लोक बसलेत. मला वाटतं तिच प्रचिती त्यांच्या सामानाच्या अग्रलेखातून दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा